अनेकवेळा ठरवून देखील आपल्याकडून छोट्याश्या रकमेचीसुद्धा बचत होत नाही. म्हणूनच 'आवर्त ठेव योजना' तुम्हाला दर महिन्याला बचत करायची शिस्त लावते. दर महिन्याला काही ठराविक रक्कम, ठराविक कालावधीसाठी या योजनेमध्ये गुंतवली तर काही कालावधी नंतर पूर्ण गुंतवलेली रक्कम आकर्षक व्याजासह परत मिळते.