मासिक ठेव योजना
आयुष्यभर काम केल्यानंतर निवृत्ती तरी आरामात आणि आनंदात घालवता यावी असे वाटणे अगदीच साहजिक आहे आणि अगदी बरोबर सुद्धा! आपल्या याच माफक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे मासिक आय योजना. या योजनेमध्ये तुम्ही एक रकमी गुंतवणूक करता आणि त्यावरील परतावा (व्याज) दर माह प्राप्त करू शकता. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला पेन्शन सुरु होते, दर महिन्याच्या खर्चासाठी पैसे मिळतात आणि आपली गुंतवणूक सुरक्षितही राहते.
MIS (मासिक उत्पन्न योजना) ची वैशिष्ट्ये
जास्तीत जास्त कितीही ठेव करू शकता रकमेसाठी मर्यादा नाही.
वयाची अट नाही.
दार महिना व्याज उचलण्याची सुविधा .
फायदे
- विशेष गुंतवणूक योजना जे मासिक उत्पन्न, सुरक्षा आणि विश्वास प्रदान करते.
- ठेवीचा किमान कालावधी: २ वर्ष.
- जास्तीत जास्त जमा कालावधीसाठी मर्यादा नाही.
- ठेवीची किमान रक्कम मर्यादा रु. ५०,००० आहे.
- जास्तीत जास्त ठेव कितीही करू शकता रकमेसाठी मर्यादा नाही.
- कोणत्याही अत्यावश्यक अडचणीच्या वेळेस रकमेची आवश्यकता असल्यास दंडाशिवाय मुदतपूर्व ८० % कर्ज काढण्याचा पर्याय.
व्याजदर (Rate of Interest)
- १२ महिन्यांसाठी रु.१,००,०००/- गुंतवा व दर महिन्याला मिळवा रु.७००/-
- १८ महिन्यांसाठी रु.१,००,०००/- गुंतवा व दर महिन्याला मिळवा रु.८००/-
- २४ महिन्यांसाठी रु.१,००,०००/- गुंतवा व दर महिन्याला मिळवा रु.९००/-
आवश्यक कागदपत्रे
- ठेवीदाराचा ओळखीचा पुरावा.
- ठेवीदाराचा पत्ता पुरावा.
- ठेवीदार अल्पवयीन असल्यास, पालकांची कागदपत्रे आणि स्वाक्षरी आवश्यक आहे.