दैनंदिन व्यवहारात आपण कितीही पैसे कमवत असलो आणि खर्चही करत असलो तरी थोड्या तरी पैशांची बचत व्हावी यासाठी नेहमीच खटपट करत असतो पण शक्य होत नाही. पण तेच जर आपण रोज थोडी रक्कम जसे रु.१०, रु.२०, रु.५० इ. दैनंदिन बचत योजने मध्ये देत गेलो तर नक्कीच आपली ती रोजची छोटी छोटी बचत मोठ्या स्वरूपात आपल्याला मिळेल आणि नकळत आपल्याला बचतीची सवयही लागेल. दैनंदिन ठेव योजने अंतर्गत आमचा प्रतिनिधी रोज आपल्याकडे येऊन पैसे जमा करून घेतो. रक्कम छोटी असल्याने तुम्हाला देखील ती देणे जड जात नाही आणि बचतही होते.